Journey Ideas
|
Dainik Gomantak
Journey Ideas: प्रवास करायला सर्वांनाच आवडते. पण प्रवास करताना लहान असो की मोठे प्रत्येकाच्या मनात वेगळाच उत्साह असतो. तुम्ही जर लहान मुलांसोबत फिरालय जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही पुढील गोष्टी बॅगमध्ये ठेवल्या पाहिजे. यामुळे तुमचा प्रवास आनंदी आणि अविस्मरणीय असेल.
औषध
लहान मुलासोबत प्रवास करताना औषध नक्की सोबत घ्यावीत. कापुस,डेटॉल सोबत ठेवावे. तसेच पोटदुखी. उलट्या, ताप आणि खोकला यासारख्या औषधांचा किटमध्ये समावेश करावा.
हँडवॉश
तुम्ही किती दिवसांसाठी सहलीला जात आहात त्यानुसार डायपर, हँडवॉश आणि वेट वाइप्स बॅगमध्ये ठेवावे. यामुळे तुम्हाला कोणतेही अडचण न येता प्रवासाटचा आनंद घेता येईल.
आवडता खेळ
सहलीला जाताना लहान मुलांचे आवडते खेळ सोबत घ्यावे. यामुळे मुलांना चिडचिडपण आणि कंटाळा येणार नाही. यामुळे ट्रॅव्हल बॅग भरताना त्यात तुमचे आवडते खेळ ठेवायला विसरू नका.
स्ट्रॉलर
सहलीला जाताना सोबत स्ट्रॉलर नक्की ठेवावा. यामुळे तुम्हाला लहान बाळांना त्यात बसवुन फिरणे सोपे होईल.
फळे आणि ज्यूस
सहलीला गेल्यावर बाहेरचे पदार्थ न खाता लहान मुलांसाठी फळं किंवा ज्युससोबत घ्यावे. यामुळे त्यांना कोणताही आजार होणार नाही.
क्रीम
लहान मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्ही डास आणि इतर कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या बॅगमध्ये चांगले मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, स्प्रे किंवा लोशन ठेवले पाहिजे.